Monday, 10 November 2014

गोष्ट एका जोडप्याची!!




कॉलेज पासून एकत्र असलेली ही दोघं. . एक व्यावहारिक (Practical) तर एक संवेदनशील (Sensitive), वास्तववादी जगात जेव्हा ही एकत्र आली तेव्हा काहीस असं घडलं. .

हतबल झालो मी, आज सखे तुझ्यापुढे. .
कोंडमारा होतो माझा, तुझ्या माझ्या घरच्यांपुढे. .

तू, तुझं करियर, तुझं घर, तुझं आयुष्य. . हा तुझा स्वभाव.
आपण, आपलं करियर, आपलं घर, आपलं आयुष्य. . हा माझा स्वभाव.

हो-नाही, हो-नाही करता करता एक दशक उलटून गेलं. .
प्रेमाच्या दिवसात प्रेम करीन म्हणता-म्हणता प्रेम करायचंच राहून गेलं. .

तुझं माझं जमेना तरीही तुझ्याविना मात्र करमेना !
तुला सोडून राहीन म्हणतो खरा. . पण मन माझं राहेना !!

सवय झालीये तुझ्या असण्याची. . सवय झालीये तुझ्या हसण्याची. .
सवय पण भारी हट्टी. . सूट म्हणता सुटेना. .
तुला सोडून राहीन म्हणतो खरा. . पण मन माझं राहेना !!

घरच्यांनीही आता हात टेकले, सगळ्यांचे डोळे माझ्या निर्णायाकडे लागले. .
दोन्हीकडून हार माझी मीच पत्करतो. .
तुला जिंकीन म्हणतो तर घरच्यांना मी दुरावतो. .
घरच्यांच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नात तुला मी गमावतो. .

थकलं भागलं मन माझं, विसावू पाहतय शाब्दिक प्रेमात,
पुन्हा पुन्हा विसावा शोधतय मायेच्या एका स्पर्शात. .


धन्यवाद!

प्राची खैरनार.


Copyrights Reserved © Prachi Khairnar.