Monday, 25 April 2016

मनातले विचार!!!


नमस्कार मंडळी, आज कुठलीही कविता, नज्म, लेख किंवा समीक्षण नाही तर काही सहज मनात आलेले विचार तुमच्या पुढे मांडावेसे वाटतायत. तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा.


शिक्षणाने मोठा झालेला माणूस मनाने आणि डोक्याने मोठा होतोच असं नाही.

                                                          * * * * * * * * * * * *

भारतात जातिवाद हा काही नवीन विषय नाही, आणि कदाचित असलेल्या जाती कमी की काय म्हणून एक नवी जात स्वतःचे  पाय अधिकाधिक घट्ट रोवतेय ती म्हणजे "पैसा". . .

                                                          * * * * * * * * * * * *

आरक्षण हे आपल्याला इतर समाजाबरोबर त्यांच्या बरोबरीने उभं राहण्याकरता होतं, अशात पैसा या जातीने कमकुवत असलेल्या पण सामाजिक स्तरावर कायद्याने आरक्षणास अपात्र असलेल्या जातीने काय करावं ? ?

                                                          * * * * * * * * * * * *

आजही जातिवाद हा एक सत्ताकारणाचाच विषय आहे, किंबहुना त्यासाठीच त्याचा वापर केला जातो आणि तो सतत तेवत ठेवला जातो. नाहीतर सर्व सामान्य जनमानसातला जातिभेद हा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे अस म्हणायला हरकत नाही. अर्थात तो समूळ नष्ट व्हायला अजून बऱ्याच पिढ्या जाव्या लागतील हेही खरच.

                                                          * * * * * * * * * * * *

शक्य आणि अशक्य यात सत्यता किंवा परिणाम नाही तर आपला दृष्टीकोन लपलाय.

                                                          * * * * * * * * * * * *

काय वाटतं ??





धन्यवाद!

प्राची खैरनार.



Copyright © Prachi Khairnar.