Saturday, 19 January 2019

देव माझा मुका झाला!!

ओझे माझे मणभर
घेऊन मी पाठीवर
उभी तुझ्या दारी मूक
साधाया क्षण अचूक

गर्दीतून गर्दीतच
रांगेतून रांगेतच
फुल गंध हार तुरे
तुला मी दिसले कारे?

ना जोडीले हे कर
ना टेकविले ते सर
ओझे तसेच राहिले
मागे तसेच वाहिले

भरला गाभारा रिता
भक्तांमध्ये तू एकटा
देव माझा मुका झाला
क्षण साधाया तो मुकला

धन्यवाद!

- प्राची खैरनार.

Copyright © Prachi Khairnar.