मोकळ्या श्वासांपरी जरी मोकळा तो जीव हा
मोकळ्या श्र्वासांमध्येही, लडखडे तो जीव हा. . .
मोकळ्या शब्दांतही, अडखळे तो जीव हा
मोकळ्या बंधनातही, धडपडे तो जीव हा. .
मोकळ्या भावनांतही, गुंततो तो जीव हा
मोकळ्या स्पर्शातही, अवघडे तो जीव हा. . .
मोकळ्याश्या या जगात, बंधतो तो जीव हा
मखमली वाटांवरीही, काट्यात रुततो जीव हा. . .
मोकळ्या श्वासांपरी जरी मोकळा तो जीव हा
मोकळ्या श्र्वासांमध्येही, लडखडे तो जीव हा. . .
धन्यवाद!
प्राची खैरनार.
Copyright © Prachi Khairnar.
Nice...
ReplyDeleteSimilar to a theme that I tried to explore "On Becoming" in studentinus.blogspot.com